भाजप – शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, भाजप ‘हि’ जागा सोडणार ?

मुंबई: शिवसेना – नाही होय करत अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत शिवसेना – भाजप युतीने लढणार हे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या भेटी दरम्यान युतीच्या जागा वाटपावर तोडगा निघाल्याच बोललं जात आहे.

Loading...

मागील चार वर्षापासून शिवसेना – भाजप युतीने सत्तेत असून देखील दोन्ही पक्षांमध्ये कायम कलगीतुरा रंगला आहे. आता लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना देखील युती होणार कि नाही हा प्रश्न कायम होता. दरम्यान लोकसभेसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ आणि विधानसभेसाठी दोन्ही पक्षांत १४४ – १४४ जागांच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे.

दरम्यान, भाजपची जागा असणाऱ्या पालघर लोकसभेसाठी शिवसेनेकडून आग्रह धरण्यात येत होता, त्यामुळे हि जागा सेनेला देण्यास भाजपने सहमती दिल्याचं देखील बोललं जात आहे. येत्या २ – ३ दिवसांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा हे अंतिम बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...