fbpx

‘भाजप – शिवसेना युती म्हणजे आम्ही दोघ भाऊ भाऊ , सगळे मिळून खाऊ’

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस पक्षांने जनमानसात विश्वास प्रस्तापित करण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनमत आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.  आज गोंदिया येथे जनसंघर्ष यात्रा येऊन पोहचली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप व शिवसेना युतीच्या चर्चेबाबत टीका केली.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची जनता भाजप व शिवसेनेमधला  वाद बघत आहे. त्यामुळे जनतेला देखील आता यांचा दिखाऊपणा कळाला आहे. शिवसेना, भाजप सध्या एकमेकांत भांडत आहेत. शिवसेना एकीकडे भाजपवर टीका करते व दुसरीकडे सत्तेचे श्रीखंड खाते. त्यामुळे हे भांडण दाखवण्या पुरते आहे. अशी टीका यावेळी चव्हाणांनी केली.

दरम्यान, दुष्काळाची दाहकता असताना शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय हे सरकार घेत नाही त्यामुळे अशा सरकारला तुम्हीच घराचा रस्ता दाखवा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी  केले.

1 Comment

Click here to post a comment