भाजप-शिवसेना हे पक्ष एक नंबरचे जातीयवादी: अजित पवार

अजित पवार

सातारा: भाजप-सेना हे पक्ष एक नंबरचे जातीयवादी आहेत. असा आरोप अजितदादा पवार यांनी केला आहे. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून अजित पवार दहीवड येथील सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, भाजप-सेना हे पक्ष एक नंबरचे जातीयवादी आहेत. जनतेने यांचा इतिहास तपासून बघायला हवा. मराठा समाजात, मुस्लिम समाजात आर्थिकरीत्या कमकुवतांना आरक्षण मिळायला हवे अशी आमची भूमिका आहे. हे सरकार फक्त अभ्यास करत आहे, कमिट्या नेमत आहे. मात्र निर्णय घेत नाही.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले, हे भाजपचे बगलबच्चे पवार साहेबांवर टीका करतात. यांची लायकी आहे का पवार साहेबांवर टीका करण्याची? भाजपने सर्व गुंडांना पक्षात घेतले आहे. असे राजकारण महाराष्ट्रात कधी झाले नव्हते. चुकीची परंपरा रुजवली जात आहे तिला थांबवण्याचे काम आपण करायला हवे.