भाजप-शिवसेना युती झाल्यास भाजपला सोडचिठ्ठी- नारायण राणे

narayan rane bjp

मुंबई: नारायण राणे पुन्हा एकदा त्यांच्या धक्कादायक विधानाने चर्चेत आले आहेत. ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलतांना राणे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसेन, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

एकीकडे शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता मध्येच नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आले. यावर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या येण्याला शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर ते सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती होणार असेल तर माझ्या भाजपमध्ये राहण्याला अर्थ नाही.

भाजप-शिवसेना युती झाल्यास राणेंनी भाजप सोडणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच २०१९ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना हाच पक्ष शत्रू असेल. असेही ते म्हणाले. कधीकाळी सत्तेसाठी धावपळ करणारे राणे दुटप्पी भूमिका आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.