Share

Sushma Andhare | “सुषमा अंधारे यांनी त्यांचं अंधारे अडनाव बदलून आगलावे करावं”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Sushma Andhare | मुंबई : आपल्या प्रभावी वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. एवढंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी अनेकांना धारेवर धरलं आहे. यावरुन भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे तुमची भाषणं महाराष्ट्र ऐकतोय, शिवाय त्यांनी मनिषाताई यांच्याकडे पाहावं आणि त्यांची काय स्थिती झाली, हे समजून घ्यावं, असं आशिष शेलार म्हणले. तसेच यावेळी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधत आणि त्यांना आडनाव बदलण्याचा सल्लाही दिला. अंधारे नाव बदलून आगलावे अडनाव लावावं असं शेलार म्हणाले.

एखाद्या स्मृती स्थळावर जाऊन वंदन करणारे मराठी माणूस ते ही मंत्री यांच्या बाबत शुद्धीकरण करण्याचा अशुद्ध विचार कसे काय सुचू शकतात, असा सवाल स्मारक शुद्धीकरणावरुन शेलारांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | मुंबई : आपल्या प्रभावी वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. एवढंच नाही तर गेल्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now