औरंगाबाद – जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात २ हजार २६१ मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडणार आहे. यंदा निवडणूक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
ग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी असलेल्या जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीत उडी घेतली आहे. राज्यात गतवर्षी सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभुत्व आहे. सेना आणि भाजपाचे शहरी भागात वर्चस्व आहे. यावेळी मात्र भाजपा-सेना या पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या आमदार-खासदारांनी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर आपले प्रभुत्व राहावे, ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी उठवली होती. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात निवडणूक होत असल्याने सर्व आमदारांनी मतदारसंघातील महत्त्वाचा ग्रामपंचायतींवर पक्षाचा झेंडा लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा
- धनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ
- काही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’