ठाकरेंसमोरच भाजप-शिवसेना आमदारांमध्ये खुर्चीनाट्य

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत जिल्हा नियोजनाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीतच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या समोर भाजपा आणि शिवसेना आमदारांमध्ये खुर्चीवरून मोठा वाद निर्माण झाला. पालकमंत्री असलम शेख यांच्या जवळ आदित्य ठाकरे एका बाजूला बसले होते तर दुसऱ्या बाजूला असलेल्या मोकळ्या खुर्चीवर भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर हे बसण्यास गेले.

त्यावर शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मनीषा कायंदे यांनी हरकत घेतली. तसेच मुंबईतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणून कोळंबर हे पालकमंत्र्यांच्या जवळ खुर्चीवर बसतील असा दावा भाजपाच्या इतर लोकप्रतिनिधींनी केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये कोण खुर्चीवर बसणार यावरून वाद झाला.

Loading...

या वादामुळे बैठकीत काही काळ तणाव देखील निर्माण झाला. त्यामुळे काही क्षण बैठक स्थगित झाली. अखेर पालकमंत्री असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला.

जिल्हा नियोजन बैठकीत विकास कामांवर शिवसेना-भाजप लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभेद एक वेळ समजून घेता येण्यासारखे आहेत परंतु खुर्चीवरून लोकप्रतिनिधींचा वाद ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. अशा वादांमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतो त्यामुळे असे वाद टाळावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिल्या होत्या. मात्र या सूचनेचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये

या आधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानापामानाचं नाट्य रंगल्याच्या बातम्या आल्या होत्या. राज्यात तीन पक्षांचं सरकार असल्याने सर्वच पक्षाचे नेते हे आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा वादांच्या घटनांच्या बातम्या बाहेर येत असतात . या आधीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि अशोक चव्हाण याच्यातला वाद झाल्याची चर्चा होती. त्यानंतरही काही वाद चव्हाट्यावर आले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात