मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी पोहोचले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी दोनवेळा बोलावूनही संजय राऊत तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळेच आज सकाळी ईडीची टीम त्याच्या घरी पोहोचली आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत देखील भडकले आहेत. “खोटी कारवाई, खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं. मी शिवसेनेसाठी लढत राहीन”, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “अपेक्षेप्रमाणे ईडी नावाचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे दाखल झाले आणि एक हाती किल्ला लढवणाऱ्या व प्रत्येकवेळी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई सुरु केली. आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील. राऊत ईडीला घाबरून भाजपला शरण गेले नाहीत. राज्यपालांच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी आहे. आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून भाजपने राज्यपालांचा राजीनामा वाचविला.”
अमोल मिटकरी यांचा आरोप –
“राज्यपालांच्या वक्तव्यावरून व शेतकऱ्यांना अजुनही भरीव मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांच्या सरकारविरुद्ध असलेल्या रोषावरून चर्चा भरकटली पाहिजे म्हणून भाजपने ईडीचा सुनियोजत कट रचलाय”, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाने ची ही नवी खेळी . आज ईडीचे पाहुणे श्री संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 31, 2022
शिंदे गटाची प्रतिक्रिया-
संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) वक्तव्य आले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “गुवाहाटीहून आमचा मृतदेह आणण्याबाबत बोलणारी व्यक्ती आज अस्वस्थ आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं, जैसी करनी वैसी भरनी.”
संजय राऊत यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी –
ईडीचे पथक आल्यानंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. राऊत यांचे समर्थक तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देत आहेत. 1 जुलै रोजी चौकशी केल्यानंतर त्यांना 20 आणि 27 जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते, परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने ते 7 ऑगस्टनंतरच हजर राहू शकतात, अशी माहिती त्यांच्या वकिलांमार्फत देण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने राऊत यांची दादर आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे.
यापूर्वी, ईडीच्या समन्सच्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा हवाला देत राऊत यांनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. दरम्यान ईडी आता थेट त्यांच्या घरी दाखल झाली आहे.
ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते-
महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची आधीच चौकशी करत आहे. त्यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते. मात्र, तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाला नाही. यानंतर आता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण-
मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे क्षेत्र आहे. यामध्ये सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मित्र आहेत. या भागात 50 हजार फ्लॅट बनवण्याचे काम एका खासगी कंपनीला मिळाले. पण 2011 मध्ये त्यातील काही भाग इतर बिल्डरांना विकण्यात आला. या प्रकरणात संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Money Laundering Case | “जैसी करनी वैसी भरनी” ; संजय राऊतांच्या ED कारवाईवर शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया!
- Kirit Somayya | “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका
- Sanjay Raut | ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मरेन पण..”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल, जमीन घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार
- Prakash Ambedkar | गुजराती माणूस निघुन गेल्याने मुंबईवर काही परिणाम होणार नाही – प्रकाश आंबेडकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<