‘मोर्चा काढायचा रद्द करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का?’

samhabjiraje chandrakant dada

कोल्हापूर : खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. मोर्चा काढायचा रद्द करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांना केला आहे.

संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. आधी मोर्चा काढतो म्हणाले. नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटले. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हणाले. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.

आम्ही मोर्चा काढणार नाही. पण दुसरे कुणी मोर्चा काढत असतील, तर त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ असे आमदार पाटील यांनी म्हटले. खासदार संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे असाही गर्भित इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या 

IMP