राहुल गांधी यांचेही लग्न झाले नाही, मग ते बलात्कारच करतात का ? – भाजप

नवी दिल्ली – काँग्रेस प्रवक्ता मानक अग्रवाल यांनी संघाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मध्यप्रदेशमध्ये जेवढ्या बलात्काराच्या घटना होत आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या लोकांचा सहभाग आहे. मी तर आरोप करतोय की, संघाचे लोक लग्न करत नाहीत, त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडतात’.असं त्यांनी म्हंटलं होत.

दरम्यान अग्रवाल यांच्या या विधानानंतर भाजपाकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भाजपाचे प्रदेश महासचिव विष्णुदत्त शर्मा यांनी अग्रवाल यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लग्न केलेलं नाहीये, मग तेही बलात्कारच करतात का असा सवाल भाजपकडून करण्यात आलाय. दरम्यान मानक अग्रवाल यांच्या य वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.