fbpx

सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून राम मंदिराचे निर्माण करू;भाजपचे जाहीरनाम्यातून वचन

टीम महाराष्ट्र देशा- दिल्लीत भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. संकल्पपत्र असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास 7500 सूचना पेट्या, 300 रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.

शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन देणार अशी घोषणा भाजपनं केली आहे.शिवाय, देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही असं देखील भाजपनं स्पष्ट केलं आहे.

लाईव्ह अपडेट:

– ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार

– कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी ३५ लाख कोटी रुपयांचा निधी

– शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज

– २०२२ पर्यंत देशभरात १० हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणार

– सर्व घटनात्मक प्रक्रियापूर्ण करून राम मंदिराचे निर्माण करणार

– लघु उद्योगासाठी एक खिडकी योजना

-देशातील सर्व घरांत वीज कनेक्शन देणार

– प्रत्येक व्यक्तीला ५ किलोमीटरपर्यंत बँकिंग सेवा उपलब्द करणार

– तीन तलाकचा कायदा बनवून मुस्लीम महिलांना न्याय देणार

– 75 नवीन मेडिकल कॉलेज आणि पदव्युत्तर कॉलेजांची स्थापना करणार – राजनाथ सिंह

– ‘एक देश, एक निवडणूक’बाबत सर्वांची मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करु – राजनाथ सिंह

– व्यवस्थापन संस्था, लॉ कॉलेजमधील जागा वाढवणार, अधिक विद्यार्थ्यांना शिकता येईल – राजनाथ सिंह

– सर्व सरकारी सेवा ऑनलाईन करणार -राजनाथ सिंह

– कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये वाढ – राजनाथ सिंह

– गरीबांसाठी गॅस एलपीजी सुविधा देणार – राजनाथ सिंह