खुद्द राष्ट्रपतींच्या सुनबाईच भाजप विरोधात

टीम महाराष्ट्र देशा : शिस्तबद्ध भाजप मध्ये बंडखोरीला जागा नाही अस छातीठोक पणे भाजप नेते सांगत असतात पण आता दस्तुरखुद्द राष्ट्रपतींच्या सुनबाई दीपा कोविंद यांनीच भाजप विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे.

त्याच झाल अस की, कानपूर महापालिकेच्या झीझक नगर समिताच्या अध्यक्षपदासाठी त्या इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली होती. पण ऐनवेळी पक्षाने सरोजिनी देवी कोरी यांना उमेदवारी दिली. त्यामुळं नाराज झालेल्या दीपा कोविंद यांनी पक्षाच्या विरोधातच बंड करत अपक्ष अर्ज भरला आहे.

आता पक्षाकडून त्याचं मन वळवण्याचे काम सुरु आहे. दीपा कोविंद या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुतणे पंकज कोविंद यांच्या पत्नी आहेत.