Karnataka Election; भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण, येडीयुरप्पा घेणार उद्या शपथ

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्ष्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. राज्यपालांनी भाजपला मिळाले सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेसने जे आमदारांच्या सह्यांच पत्र होतं त्यात तीन आमदारांच्या सह्या नव्हत्या हे कारण राज्यपालांकडून देण्यात आलं आहे. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. स्वतःची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली आहे. या बाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती येडीयुरप्पा यांनी राज्यपालांना केली होती.

कॉंग्रेसने या राज्यपालांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून न्यायालयीन लढाईची तयारी सुरु केली आहे. दरम्यान,राज्यपालांनी घटनेचे पालन केले नाही आणि आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले नाही तर रक्ताचे पाट वाहतील अशी खुली धमकीच काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी ही धमकी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आल्याने कर्नाटक निवडणुकीत आणखी रंगत आली आहे.येडीयुरप्पा यांची आज सकाळी विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Gadgil