औरंगाबाद : नामांतराच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेल्या औरंगाबादेत अवघ्या काही महिन्यांत मनपा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. 16 जानेवारी रोजी शहरात प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मनपाच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे.
शहरातील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे व प्रमुख नेते उपस्थित होते. यात संभाजीनगर नामांतराचा मुद्दा उचलून धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रनिहाय रचनेनुसार आढावा घेण्यात आला. यात मिशन 60 प्लस हाती घेऊन सर्व जागा लढण्याचा निर्धार, उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. मनपा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असल्याचे बोलले जात असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
- नामांतरला नुसता विरोध नको तर सत्तेतून बाहेर पडा; आठवलेंचा काॅंग्रेसला सल्ला
- श्रीराम मंदिराकरीता श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाखांचा निधी
- सफारी पार्कला मिळणार ‘ऐतिहासिक लुक’
- बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा
- ‘स्पायडर मॅन स्पायडर मॅन…’ जाणून घ्या का होतोय पंत ट्रोल