भाजपची जय्यत तयारी; निर्मला सितारमण यांची तोफ पुण्यात धडाडणार

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट आणि कॉंग्रेसचे उमेदवार माही आमदार मोहन जोशी यांच्यात सामना होणार आहे. भाजपचे पारडे पुण्यात जड असले तरीही विजयात कोणतीही कसर सोडण्याच्या मनस्थितीत भाजप नसल्याचे चित्र आहे. यामुळेच भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण या पुण्यात सभा घेणार आहेत.

सितारमण येत्या १० एप्रिल राेजी त्या पुण्यात येणार असून नेहरु मेमाेरिअल हाॅल येथे त्या सभा घेणार आहेत. तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात दाेन ठिकाणी सभा घेणार आहेत. दरम्यान दाेन्ही पक्षांकडून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना शहरात प्रचारासाठी आणण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दाेन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते पुण्यात येण्याची शक्यता आहे.