भाजपला धक्का! ‘या’ मित्राने सोडली साथ

मांझी यांच्या निर्णयाचा भाजपला चांगलाच फटका

पटना: टीडीपी आणि शिवसेना एनडीए मधून बाहेर पडण्याच्या तयारीत असतांना हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये गळती सुरु झाली आहे.

bagdure

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी एनडीए तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मांझी यांच्या निर्णयाचा भाजपला चांगलाच फटका बसणार आहे. लोकसभा २०१४च्या निवडणुकीतील विजयानंतर एनडीएतून बाहेर पडणारे मांझी दुसरे नेते आहेत. राष्ट्रीय जनता दल च्या नेत्यांची भेट नाराजी व्यक्त केली होती. मांझी यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन एनडीएतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

जहानाबान येथील पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवारीसाठी मांझी इच्छुक होते. पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. यानंतर मांझी यांनी एनडीएत प्रत्येकाला काही ना काही दिले जात आहे. मात्र मीच एकटा असा आहे; ज्याला काही मिळत नाही, असे बोलून नाराजी व्यक्त केली होती.

You might also like
Comments
Loading...