25 दिवसांचा लॉकडाऊनचा भाजपने निवेदन देत औरंगाबादेत केला निषेध

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी औरंगाबाद (ग्रामीण) यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांच्या विरोधात असलेला ब्रेक दी चेनच्या नावाने लावलेला लॉक डाऊन हा व्यापारी वर्गावर अन्याय करणारा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. भाजपच्या वतीने लॉकडाऊनचा विरोध करुन निषेध देखील व्यक्त केला आहे.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वर्ष भरापासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे अर्थ चक्र विस्कळीत झालेले आहे. वर्षभरातील बंद काळात सुद्धा बँकेचे हफ्ते त्यावरील व्याज, लाईट बील, दुकानाचे भाडे सरकारी अनेक प्रकारचा टॅक्स, नौकरवर्गाचा पगार, हा बंद काळातला सुद्धा भरावा लागत आहे. बँका कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवत आहेत. महावितरण लाईट कट करत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग अगोदरच रसातळाला गेला आहे. असे असताना तसेच सरकारला कोरोनाला रोखण्यात आलेल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी परत व्यापाऱ्यावर व जनतेवर ब्रेक द चेन नावाचे 25 दिवसांचे लॉकडाऊनचे भूत उभे केले असल्याचे देखील या निवदनामध्ये म्हटलेले आहे.

लॉक डाऊन हा पर्याय नाही, हे सरकारमधील अनेक नेते देखील म्हणत आहेत. असे असताना सुद्धा फक्त आणि फक्त शासनाचे अपयश झाकण्यााठी केवळ व्यापाऱ्यांवर लावलेल्या लॉकडाऊनचा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी औरंगाबाद ग्रामीण निषेध व्यक्त करत आहे. तसेच येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर महाराष्ट्र सरकारने निर्णय परत घेतला नाही, तर व्यापारी आपली दुकाने उघडतील. त्या वेळेस होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारवर राहील याची नोंद सरकारने घ्यावी, अशी विनंती वजा निवेदन दिले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना या वेळी निवेदन दिले. त्या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष, भाजपा व्यापारी आघाडी, मराठवाडा संघटक, चिटणीस यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या :