तुळजापूर – राज्यसरकारला दुधदरवाढ करण्याची सुदबुध्दी देण्यासाठी भाजपाने घातला जागरण गोंधळ

bjp protest tuljapur

तुळजापूर – आघाडी सरकारला शेतकऱ्यांना दुध दरवाढ देण्याची सुबुध्दी श्रीतुळजाभवानी मातेने द्यावी या साठी भारतीय जनता पार्टीच्या देवी दारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेवुन आघाडी सरकारच्या विरोधात शनिवार दि1 रोजी आंदोलन करण्यात आले. या जागरण गोंधळाचा विधी राजाभाऊ गायकवाड यांनी केला.

त्यावेळी बोलताना आमदार राणा जगजितसिंह  पाटील,म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्या बाबतीत दुजाभाव करणारे हे ञिमुर्ती आघाडी सरकार आहे.यांना आंदोलनाची भाषा कळत नाही त्यामुळे आता आम्हाला यांना देविनेच सदबुध्दी द्यावी यासाठी हेजागरण गोंधळ आंदोलन केल्याचे सांगुन शेतकऱ्यांना दुधदरवाढ मिळवून दिल्या शिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचे यावेळी सांगितले .

या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिलजी काळे तालुका अध्यक्ष संतोष दादा बोबडे,जिल्हा मजूर फेडरेशन चे माजी चेअरमन तथा नगरसेवक नारायण नन्नवरे नगरसेवक विशाल रोचकरी अभिजीत कदम , मिना सोमाजी प्रभाकर  मुळे शहर अध्यक्ष सुहास साळुंके,जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक ,संजय खुरुद सागर कदम  विकास मलबा , बाळासाहेब शामराज,बाळासाहेब शिंदे आनंद कंदले, उमेश गवते,सचिन अमृतराव, गिरीश देवळालकर,,प्रसाद पानपुडे,विकास मलबा,बाळासाहेब भोसले,सचिन रसाळ,सागर कदम,सागर पारडे,हरिभाऊ वट्टे,विक्रांत देशमुख, तानाजी कदम उमेश गवते, आनंद कदम, शहाजी कदम उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले खंडन