राहुल गांधींचा मेंदू सपाट तर झाला नाही ना, जे.पी. नड्डांची घणाघाती टीका

rahul-gandhi-jp-nadda

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. . राहुल गांधी म्हणतात की, देशाच्या विकासाचा आलेख सपाट झाला आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सपाट झाला नाही. हे वक्तव्य पाहता त्यांचा ‘वंशपरंपरागत’ मेंदू सपाट तर झाला नाही ना, अशी शंका वाटत असल्याचे नड्डा यांनी म्हटलय. ‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत नड्डा यांनी राहुल गांधी यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

देशात कोरोनाचे संकट असताना काँग्रेसने राजकारण सोडून काहीच केले नाही. गांधी कुटुंबीयांनी सुरुवातीला मजुरांची खिल्ली उडविली. त्यांनी लॉकडाऊनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता लॉकडाऊन उठवला तर तेच विचारतात की लॉकडाऊन इतक्या लवकर का उठवला? अनेक काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्रीही लॉकडाऊन हटवू नये, या मताचे आहेत. गांधींनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केले. एकूणच काँग्रेसने निमित्त शोधून केवळ राजकारण केले, असे नड्डा यांनी म्हटले. दरम्यान, या मुलाखतीत नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच आगामी बिहार विधानसभा निवडणूक आणि भारत-चीन सीमाप्रश्नासंदर्भातही भाष्य केले.

बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा, .प्रितम मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण होऊन निवडणुकीपूर्वी असलेली भाजप-शिवसेना युती तुटली आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला  सोबत घेऊन शिसेनेने सत्तेत येत भाजपला सत्तामोहिनिपासून दूर ठेवले. याचीच खात भाजपच्या शिरस्त नेतृत्वाला राहून राहून बोचत असते हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात आमच्यासोबत धोका झाल्याच बोलून दाखवलं आहे.

उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबतच निवडणुकी लढवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा पराभव झाला असून आम्हीच जिंकलेलो आहोत. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झालाय, असे उत्तर नड्डा म्हणाले आहेत.

धक्कादायक : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की