‘या’ अभिनेत्याने घेतली भाजपाध्यक्ष अमित शहांची पुण्यात भेट,राजकीय चर्चांना उधाण

amit shaha

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक सिनेकलाकार राजकारणात एन्ट्री करताना पहायला मिळत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या राजकारणातील धमाकेदार एन्ट्री नंतर निवडणुकांच्या या धामधुमीत आता आणखी एका अभिनेत्याचे नाव चर्चेत आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे एअरपोर्टवर बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भेट घेतली. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांची ही भेट झाली. या भेटीनंतर सनी देओल लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

सनी देओल हा पंजाबच्या अमृतसरमधून निवडणूक लढवू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भाजपमधील काही बड्या नेत्यांनी अमित शाह आणि सनी देओल यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण या भेटीनंतर नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.