आजवर रायबरेलीने परिवारवाद पाहिला, विकास नाही – अमित शहा

amit shah

रायबरेली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत कॉंग्रेसवर टीका केली आहे. रायबरेलीने आजवर विकास पहिला नाही, मात्र फक्त परिवारवाद पहिल्याची टीका शहा यांनी केली आहे. तसेच वोटबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेसने केवळ हिंदूंच्या संस्कृतीला बदनाम करण्याचं काम केल्याची टीकाही त्यांनी केली.

गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या रायबरेलीमध्ये आज अमित शहा यांची भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी रायबरेलीला परिवारवादपासून मुक्त करण्याच्या अभियानाला आजपासून सुरूवात करणार असल्याच म्हणत शहा यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.

पूर्वी उत्तर प्रदेश हे गुंडगिरी आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेसाठी ओळखले जात होते. पण योगी सरकार सत्तेवर आल्यापासून गुंडांनी पलायन केल्याचं सांगत अमित शहा यांनी योगी सरकारच कौतुक केल.