fbpx

त्यांनी केवळ पक्षातील सर्वोच्च नेत्यांच्या देशव्यापी अस्थिकलश यात्रा काढल्या: अमित शहा

amit shah

ब्रिटिश लोकांनी स्थापन केलेल्या कॉंग्रेस पक्षाने आजवर केवळ स्वत;च्या नेत्यांचे अस्थिकलश फिरवण्यासाठीच देशव्यापी यात्रा काढल्याची टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. रांची येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना शहा यांनी गांधी घराणे आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने केवळ पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचे अस्थिकलश फिरवण्यासाठीच देशव्यापी यात्रा काढल्या आहेत. तर आता राहुल गांधी कोणताच कलश न घेता यात्रेसाठी निघालेत असा टोला अमित शहा यांनी लगावला.

भाजप केवळ निवडणुका जिंकण्याचा विचार करत नाही. तर आम्ही लोकांची विचारपद्धती बदलली आहे, असे म्हणत शहा यांनी भाजपने काढलेल्या देशव्यापी यात्रांचा पाढा वाचून दाखवला. आमच्या पक्षाने जनसंघाच्या काळापासून गोहत्या बंदी, गोवा मुक्तिसंग्राम, काश्मीर ते कन्याकुमार एकता यात्रा, राम जन्मभूमी आंदोलन, सोमनाथ अशा अनेक मुद्द्यांवर देशव्यापी दौरे काढल्याच अमित शहा यांनी सांगितले आहे. तर राहुल गांधीचे देशात कोणी ऐकत नाही त्यामुळे अमेरिकेत जाऊन ते भाषण देत असल्याची टीका देखील त्यांनी केली.