भाजपच्या पापाचे भागीदार होयचं नाही, पिंपरीत नगरसेवकाचा भाजपला रामराम

पिंपरी: इतिहासात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने सत्ता मिळवली आहे. मात्र, सत्तापुर्तीच्या एका वर्षामध्येच भाजपमधील अंतर्गत कलह उफाळून येत आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि अनेक राज्यांमध्ये वाढलेल्या दलित अत्याचारांच्या घटनांमुळे आज देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे  भाजपच्या पापाचे भागीदार होयचं नाही म्हणत नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपला रामराम केला आहे.

कोणत्याही स्थानिक नेत्यावर आपली नाराजी नाही, मात्र गेल्या वर्षभरात शहरातील कच-याचा प्रश्न भाजपला सोडविता आलेला नाही. अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, देशभरात वाढलेले दलित अत्याचाराचे प्रमाण असताना हे रोखण्यासाठी काहीच होत नसल्याच ओव्हाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या पुढील काळात आपण भाजपच्या राजकारणापासून दूर राहणार आहोत. भाजपच्या विचारला आणि धोरणांना आपला विरोध आहे. तसेच आपल्या भुमिकेमुळे भाजपने कारवाई केल्यास त्याला समोर जायला तयार असल्याच बाळासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले.