आयारामांमुळे भाजप कार्यकर्त्यात मतभेद, प. महाराष्ट्रातील पद वाटपावरून लोढांसमोरचं राडा

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विरोधीपाक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या नवीन आलेल्या नेत्यांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे भाजपमधील निष्ठावंतांमध्ये मतभेद झाल्याच दिसत आहे. भाजप पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासमोरच भाजप पश्चिम महाराष्ट्र आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध पदांवरील नियुक्त्यांवरून निदर्शनं केले आहे. तर नियुक्त्यांबाबत आक्षेप घेत बाचाबाची झाली असल्याच समोर आले आहे.

भाजपची पश्चिम महाराष्ट्र आघाडी ही प. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांशी संपर्क आणि पक्ष प्रचारासाठी स्थापन केलेली आघाडी आहे. दोनच महिन्यांपूर्वी मुंबई प्रदेशाध्यक्ष झालेल्या मंगलप्रभात लोढा यांनी या आघाडीच्या अध्यक्षपदी मर्जीतल्या माणसाची नियुक्ती केल्याचा आरोप पक्षाच्या प. महाराष्ट्र आघाडीचे विद्यमान प्रमुख वसंतराव जाधव यांनी केलाय. एकीकडे हे निवडणुकीचं वर्ष असताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नियुक्त्या होणं योग्य नाही. नव्या लोकांचं पक्षात स्वागत आहे मात्र त्यापायी निष्ठावंतांवर अन्याय नको, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

दरम्यान आयारामांमुळे भाजपमधील निष्ठावंतांना डावल जात असल्याच दिसत आहे. तर अनेक मतदारसंघात तिकीट कोणाला मिळणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होत असल्याची चर्चा आहे. मात्र लोढा आणि कार्यकर्त्यां मधल्या बाचाबाची वरून तरी भाजपात सगळ काही सुरळीत चालू असल्याच दिसत नाहीये. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला भाजप निष्ठावंत आणि भाजपमधील आयाराम यांच्यात खटके उडणार असल्याच दिसत आहे.