‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है.’

Narendra-Modi-victory

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरा मेघालय आणि नागालँडमधील भरघोस यशानंतर आज नवी दिल्लीत भाजपाच्या संसदीय बैठकीला सुरुवात झाली आहे.या बैठकीत ‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है.’ हा नवा नारा भाजप खासदारांनी दिला आहे. या बैठकीला भाजपचे सर्व मंत्री, पंतप्रधान मोदींसह भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणीही हजर आहेत.

अधिवेशन काळात दर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक घेण्यात येते. त्यामुळे आजही या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठकीसाठी सभागृहात येताच ‘जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है.’ अशा घोषणा भाजप खासदारांनी देण्यास सुरुवात केली.