‘पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला’

बीड : ‘पराभव झाल्यामुळे मी जास्त वेळ घरीच असते आणि म्हणून घरातल्या व्यक्तींना मी वेळ देऊ शकते. आता घरातल्या व्यक्तींसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे माझ्या घरातील लोक आनंदी आहेत,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

त्या बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पाच वर्षे सत्तेत राहून माझा पराभव झाला. मात्र याचा आनंद सर्वात जास्त माझ्या मुलाला झाला आहे,’ असे त्या म्हणाल्या. तसेच ‘पाच वर्ष सत्तेनंतर आम्ही निवडणुकीला समोर गेलो. यात माझा पराभव झाला. राजकीय कामांमुळे मला घरी वेळ देता येत नव्हता. मात्र आता वेळ देत असल्यामुळे मुलाला आनंद झाला,’ असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Loading...

तसेच सामान्य माणसासाठी मी राजकारण करते. बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी आणला. इथून पुढे दोन वर्ष मी आणलेल्या निधी तून कामे होतील. विकास, शांतता, रस्ते, पाणी देण्याचा प्रयत्न केला,’ असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, पराभवाने खचून जाणे हे रक्तात नाही. ‘आता वेळ आहे म्हणून माझा मुलगा आर्यमान म्हणतो बंर झाल आई तू पडली. आम्हाला आता वेळ मिळेल म्हणून सर्वात जास्त आनंद त्याला झाला,’ असे पंकजा मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....