दारूण पराभवानंतर भाजप बॅॅकफुटवर, शिवसेनेसोबत युती होणारचं,शाह यांना खात्री

टीम महाराष्ट्र देशा- आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत असेल, अशी खात्री शहा यांनी व्यक्त केली आहे.अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांमध्ये काल उशिरा रात्री सह्याद्री अथितीगृहावर बैठक पार पडली. तब्बल अडीच तास या बैठकीत खलबतं झाली. तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळं महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळण्यावर या बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर भाजपचं नेतृत्व जोमानं कामाला लागलं आहे. तब्बल अडीच तास या बैठकीस यावेळी मुख्यमंत्र्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार हे महत्वाचे नेते उपस्थित होते.

तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अपयशाबद्दल देखील त्यांनी मत व्यक्त केले आहे. तीन राज्यांतील निकालांवर आम्ही आत्मपरिक्षण करू. तिन्ही राज्यांत जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हिंदी भाषिक पट्ट्यात विजय मिळवेल, असा दावा त्यांनी केला आहे.