‘मेक इन महाराष्ट्र आहे की फुल इन महाराष्ट्र’; भाजपच्या ट्विटर वरून मुख्यमंत्र्यांवरच टिका

टीम महाराष्ट्र देशा : विविध योजना आणि सरकारच्या धोरणांवर विरोधी पक्षांकडून कडाडून टिका केली जात आहे. सोशल मिडीयावर देखील मुख्यमंत्री आणि भाजपला टार्गेट केलं जात. मात्र अशातच खुद्द भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयावर टीका करण्यात आली.

bagdure

‘राज्यामध्ये किमान दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फडणवीस सरकार ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. मग हे मेक इन महाराष्ट्र आहे की फुल इन महाराष्ट्र’ अशा प्रकारच ट्विट भाजपच्या हँडलवरुन करण्यात आल. रविवारी (3 डिसेंबर) ला सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी हे ट्विट केलं गेल .

हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टॅग करण्यात आलय. दरम्यान हा सर्व प्रकार समोर येताच ट्वीट डिलीट करण्यात आल. मात्र तोपर्यंत याचे स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाले होते.

You might also like
Comments
Loading...