प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाल्यास भाजपचंं एकही कार्यालय ठेवणार नाही, भीम आर्मीची धमकी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सोलापुर मतदार संघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मी कडून देण्यात आली आहे. आवघ्या काही तासातचं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे.

याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते 40 जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचे प्रसार माध्यमांच्या एक्झिट पोल मध्ये दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि आकोला या दोन लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.

Loading...

याचदरम्यान, प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लढत आहेत. सोलापुरातून जर त्यांचा पराभव झाला तर भाजपचे सर्व कार्यालयं तोडून टाकू. शिवाय राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरु देखील देणार नाही. अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

विशेष म्हणजे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात ही तिरंगी लढत झाली होती. आता प्रतीक्षा ती केवळ निकालाची.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत