Pune- भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भि़डले

गणेश बीडकर आणि गणेश घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पुणे : पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरुन भाजप कार्यालयातच कार्यकर्ते एकमेकांशी भि़डले. गणेश बीडकर आणि गणेश घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली.  दुपारी दोन ते चार ही वेळ स्वीकृत सदस्य निवडीचे अर्ज भरण्याची मुदत होती.

महापालिकेत झालेला हाणामारीचा आणि भाजप कार्यालयात झालेल्या तोड़फोडीचा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली आहे. पक्ष कार्यालयांच्या दुरुस्तीचा खर्च भाजप करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.You might also like
Comments
Loading...