शिवसेनाला खुश करण्यासाठी भाजपची मोठी खेळी

टीम महाराष्ट्र देशा : कधीकाळी मित्र असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये कमालीची कडवटता आली आहे. त्यात शिवसेनेने एकला चलोचा नारा दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अस्वस्थ झालेल्या भाजपाने आपल्या या जुन्या मित्राला खूश करण्यासाठी राज्यसभेतील मोठं पद देण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपतोय. हे रिक्त होणारं मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपाश्रेष्ठी तयार असून त्यांनी तसा पर्याय शिवसेना नेतृत्वापुढे ठेवला आहे. तो स्वीकारायचा किंवा नाही, याचा निर्णय अर्थातच उद्धव ठाकरे घेतील. राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. त्यात संजय राऊत सर्वात ज्येष्ठ, अनुभवी आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना राज्यसभेच्या उपसभापती पदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.