Share

Deepali Sayyed | “…तरच त्यांना शिंदे गटात प्रवेश द्यावा” ; दीपाली सय्यद यांच्या प्रवेशावर भाजपचा आक्षेप

Deepali Sayyed | मुंबई : दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी केली होती. मात्र आता त्यांनीच एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दिपाली सय्यद यांना शिंदे गटात घेण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने विरोध दर्शवला आहे.

भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी (Deepali Mokashi) यांनी यासंदर्भात भाष्य केलंय. दिपाली सय्यद यांनी आधी भाजपाची बिनशर्त माफी मागावी, खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात, त्यानंतरच त्यांना शिंदे गटात प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, कथाकथित स्वयंभू नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyed) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली. त्यांना सुबुध्दी येण्यास फारच उशीर झाला. पण हरकत नाही. सय्यद यांनी याआधी प्रसिद्धीपोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यारितीने आक्षेपार्ह आणि खालच्या शब्दात टीका केली होती, याबद्दल माफी मागावी.

तसेच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दिल्या होत्या. महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांवरील तक्रारी मागे घ्याव्यात, अन्यथा त्यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध असेल, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने आता दिपाली सय्यद माफी मागतात का?याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Deepali Sayyed | मुंबई : दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now