गुजरात निवडणूक: प्रचाराच्या ध्र्रळ्यात जाहीरनामा आणायचंच भाजपा नेते विसरले

gujrat bjp manifesto

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान उद्या म्हणजेच ९ डिसेंबरला होणार आहे. विधानसभेच्या ८९ जागांसाठी गुजरातमधील नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान कोणत्याही निवडणुकांत राजकीय पक्षांचे नागरिकांसाठी असणारे विकासाचे व्हिजन दाखवणारा जाहीरनामा महत्वाचा असतो. मात्र सध्या सुरु असणाऱ्या निवडणुकीच्या झंझावातात सत्ताधारी भाजप जाहीरनामाच आणायला विसरले असल्याच दिसत आहे.

गेली २२ वर्षे गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. या काळात केलेल्या विकासाचे मॉडेल संपूर्ण भारताला दाखवत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने येणारी नागरिकांची नाराजी. बहुसंख्य असणाऱ्या पाटीदार समाजाचा आरक्षणावरून असणारा विरोध. आणि आक्रमक कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा सामना करत भाजपला जिंकायची आहे. मात्र अस असताना देखील भाजपने आपला ‘जाहीरनामाच’ आणला नसल्याने आता विरोधकही टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत.

‘गुजरातमध्ये नागरिकांप्रती भाजपची कमालीची अनास्था दिसत आहे. त्यामुळेच आता निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला तरी जाहीरनामा आणण्यात आलेला नाही. यावरून भाजपकडे कोणतेच व्हिजन किंव्हा विकासाच्या कल्पना दिसत नसल्याच’ ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.