नथुरामसंबंधीच्या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही, साध्वीला माफी मागावी लागेल : भाजपा

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या वादग्रस्त विधानांमुले कायम चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी कमल हसन प्रत्युत्तर देताना आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करावे, अशा लोकांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मिळेल. असं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हंटले आहे.

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने खळबळ उडवली आहे. हसन यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी टीका देखील केली आहे. दरम्यान, प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणल्याने आणखीन वाद निर्माण होणार असल्याचं दिसत आहे.

साध्वीला सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल : भाजप

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल, भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही. आम्ही याची निंदा करतो. पक्ष साध्वीला याचे स्पष्टीकरण मागेल, तिला देखील या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागावी लागेल. असे भाजपा प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहाराव यांनी म्हटले आहे.