‘भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार हि काळ्या दगडावरची रेघ’, अंजली दामानियांचा दावा

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. यावरून वेगवेगळ्या चर्चांना तर्क लावला जात आहे. दरम्यान यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. असे विधान केले आहे. त्यांनी समाज माध्यमावर याबाबतीत ट्विट केले आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ दिला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. याविषयी दमानिया ट्वीटमध्ये लिहिले आहे, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसं लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपाविरुद्धच आहोत”.

आता अंजली दमानिया यांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.त्यामुळे आता भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार हा त्यांचा दावा कितपत खरा उतरतो हे येणारा काळ ठरवेलच.

महत्वाच्या बातम्या