भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजापलाच दिला घरचा आहेर

amit_shah

बंगळुरु: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या येडियुरप्पा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. जर भ्रष्टाचारासाठी कुठल्या सरकारला बक्षीस द्यायचं असेल तर ते येडियुरप्पा सरकारला द्यायला हवं असं चुकून अमित शाह बोलून बसले आहेत. येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

कर्नाटक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अमित शाहांनी सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सिद्धरामय्या सरकारवर टीकेची झोड उठवतानाच चुकून येडियुरप्पा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. जर भ्रष्टाचारासाठी कुठल्या सरकारला बक्षीस द्यायचं असेल तर ते येडियुरप्पा सरकारला द्यायला हवं असं चुकून अमित शाह बोलून बसले आहेत. कर्नाटकमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.
भाजपाध्यक्ष बोलत असताना त्यांच्या डाव्या बाजूला स्वत: बी एस येडियुरप्पा बसले होते. तर उजवीकडे पक्षाचे आणखी एक नेते बसले होते. यावेळी भ्रष्टाचारात सिद्धरामय्यांऐवजी येडियुरप्पांचं नाव घेतल्यानंतर, उजवीकडे बसलेल्या नेत्याने त्यांना चुकीची जाणीव करुन दिली. यानंतर आपल्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडल्याचं जाणवल्यानंतर अमित शाहांनी शब्द फिरवले.

कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात १२ मे रोजी मतदान होणार असून १५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या हातात असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटक असून ते जिंकण्यासाठी भाजपा जीवाची बाजी लावणार असल्याचे दिसत आहे.

1 Comment

Click here to post a comment