भाजपच्या खासदाराने शेतकऱ्यांची केली ‘माओवादाशी’ तुलना

poonam mahajan

नवी दिल्ली: आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांविषयी भाजप खासदारानं माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, असे विधान केले आहे. शेतकऱ्यांची थेट माओवादाशी तुलना मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.

अनवाणी पायाने शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च काढला आहे. मात्र त्यांची दखल न घेता. भाजप खासदाराने त्यांची तुलना थेट माओवादाशी केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, अशी मुक्ताफळं खासदार पूनम महाजन यांनी उधळली.

उन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता हजारो शेतकरी तब्बल २०० किलोमीटर पायी चालून सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढत आहेत. मात्र त्यांना आधार देण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील खासदार माओवादाचं लेबल लावून शेतकऱ्यांची हेटाळणी करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आता शेतकऱ्यांनाच वाट्टेल ते बोलत आहे. त्यामुळे याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सुप्रियाताई म्हणाल्या, पायात काटा रुतल्यावर वाहणारं रक्त लाल असतं म्हणून ते माओवादी नसतं. शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामालाही कुठल्याच राजकारणाचा वास नसतो. हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे.

न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी माओवादी म्हणणाऱ्यांचा निषेध. पायात काटा रुतल्यावर वाहणारं रक्त लाल असते म्हणून ते माओवादी नसतं. शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामालाही कुठल्याच राजकारणाचा वास नसतो. हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे. न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी माओवादी म्हणणाऱ्यांचा निषेध.