भाजपच्या खासदारांना मोदी नकोसे ; मोदींना पर्याय शोधण्याचे काम सुरु- कुमार केतकर

kumar ketkar

ठाणे : भाजप आणि संघाकडून मोदींना पर्याय शोधण्याचे काम सुरु झाले आहे. तसेच भाजपच्या खासदारांना मोदी नकोसे झाले असल्याचे खासदार कुमार केतकर यांनी स्पष्ट केले.  काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे ‘विभाजित राजकारण आणि मंदावलेली अर्थव्यवस्था’ या विषयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान केतकर बोलत होते.

Loading...

मोदींना पक्षांतर्गत पर्याय शोधण्याचं काम सुरु असून त्यात नितीन गडकरी, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज अशी नावं आघाडीवर आहेत. असा दावा देखील केतकर यांनी केला आहे. तसेच येत्या निवडणुकीत भाजपचे २८२ तर दूरच, पण मुश्किलीने १५० खासदार निवडून येतील, असंही केतकर म्हणाले.

सध्या मोदींना पर्याय कोण? असा प्रश्न विचारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची त्यांच्याशी तुलना केली जाते. यातून मोदी हेच अपरिहार्य असल्याचं जनतेच्या मनावर बिंबवलं जातं. मात्र आमच्या महागठबंधनमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत, या चर्चासत्रात पी. चिदंबरम यांच्यासह खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सहभागी झाले होते.Loading…


Loading…

Loading...