भाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे : मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे हे लवकरच ‘आमदार’ होणार हे निश्चित आहे.परंतु नेमकं कोणत्या मतदारसंघातून ते आमदार होणार हे भाकीत करणे माञ अवघड असल्याचे सांगून भाजपचे खा.सुनिल गायकवाड यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष  डाँ.भिकाणे  यांना  ‘आमदारकी’च्या शुभेच्छा दिल्या.

निमित्त होते डाँ.भिकाणे यांच्या लातूर येथील ‘मातृकृपा क्लिनिक’च्या शुभारंभाचे .त्यावेळी ते बोलत होते.डाँ.नरसिंह भिकाणे हे मुळचे मानखेड ता.अहमदपूर येथील.परंतु मुंबई  येथून बी.ए.एम.एस.ही वैद्यकीय शास्ञाची पदवी संपादन केल्यानंतर डाँ.भिकाणे यांनी २००७ पासून निलंगा या शहरात वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. अहमदपूरचे पहिले आमदार अँड निवृत्ती रेड्डी यांचे नातू असल्यामुळे डाँ.भिकाणे यांना राजकीय क्षेञ खूणावू लागले.त्यामुळे साहजिक त्यांनी मनसेत प्रवेश केला.मागील १४-१५ वर्षापासून ते मनसेत कार्यरत असले तरी राजकारणाला  त्यांनी ख-या अर्थाने समाजकारणाची जोड दिल्यामुळे निलंगा तालुक्यासह ते जिल्हाभर परिचित आहेत.

पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी अभिनव आंदोलने करुन सामान्य जनतेला न्याय दिला आहे.तर आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना त्यांनी मोठा दिलासा दिला आहे.त्याचबरोबर प्रवचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रबोधन करतात.

डाँ.भिकाणे यांच्या या  कार्याची दखल घेवून त्यांना विविध सामाजिक संस्थेच्यावतीने पुरस्कार देवून वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या विविध प्रतिष्ठित पुरस्कारामुळे डाँ.भिकाणे यांची ‘पुरस्कार फेम डाँक्टर’अशी जिल्हाभर विशेष ओळख निर्माण झाली आहे.डाँ.भिकाणे यांच्या या सामाजिक,राजकीय व अध्यात्मिक कार्यामुळे मागील काही महिन्यापासून त्यांच्या नावाची आमदारकीसाठी जोरदार चर्चा ऐकावयास येत आहे.

त्यामुळे ते  आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी जन्मभूमी असलेल्या अहमदपूर मतदारसंघाची निवड करतात की कर्मभूमी असलेल्या निलंगा मतदारसंघाची निवड करणार हा पत्ता माञ डाँ.भिकाणे यांनी अद्याप खुला केला नाही.त्यामुळे सदरील पार्श्वभूमीचा धागा पकडत  डाँ.भिकाणे यांचे काम पाहता ते आमदार होणार हे निश्चित  आहे पण कोणत्या मतदारसंघातून ते आमदार होतील हे सांगणे अवघड आहे असे म्हणत खा.सुनिल गायकवाड यांनी यावेळी बोलताना गुगली टाकून दिली.या गुगलीची माञ राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे हे माञ निश्चित !