‘पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असले तरी…’ सुजय विखेंचा अजब युक्तिवाद वाचून डोक्याला हात लावाल !

sujay vikhe

अहमदनगर : देशातील पेट्रोलच्या किंमतीत आजही वाढ झाली आहे. आज पेट्रोल 28 पैशांनी महाग झालं असून मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 107.20 रुपयांवर गेली आहे तर डिझेलची किंमत 17 पैशांनी घटून ती 97.29 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 101.23 रुपयांवर गेली आहे तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घट झाली असून त्याची किंमत 89.76 रुपये इतकी झाली आहे.

एकीकडे इंधनदरवाढीने सामान्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले असताना भाजप नेते मात्र अजब विधाने करण्यात गुंग आहेत. ‘इंधनाचे दर वाढले हे खरे असले तरी त्या बदल्यात मिळलेल्या सुविधा पाहाव्यात. इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना करोना प्रतिबंधक लस मोफत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलकही दाखवा’. असा अजब आणि संतापजनक युक्तिवाद अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी केला आहे.

तर, ‘३५ हजार कोटी रुपये खर्चून एवढी मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. हेच काम राज्य सरकारकडे होते, तेव्हा जागतिक निविदा काढूनही त्यांना ते करता आले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारने केलेल्या या जनहिताच्या कामाचीही नोंद घेतली पाहिजे’. असा टोला यावेळी विखेंनी कॉंग्रेसला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP