बेळगाव प्रश्नावर भाजप खासदार बनसोडेंच वादग्रस्त विधान, शिवसैनिकांनी जाळला बनसोडेचा पुतळा

बार्शी: सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी बेळगाव वादावर उधळलेल्या मुक्ताफळानंतर आता शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. बनसोडे यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत बार्शीमध्ये शिवसैनिकांकडून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष दीपक आंधळकर, नाना वाणी, अशपाक शेख, अण्णा माने, मामा भिसे तसेच इतर शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे शरद बनसोडे याचं वादग्रस्त विधान

‘महाराष्ट्रातल्या उमदीसारख्या गावामध्ये एकही माणूस मराठीत बोलत नाही़ मग तुम्हाला कशाला पाहिजे बेळगाव़़; अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार शरद बनसोडे यांनी सोलापुरात कन्नड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलताना उधळली़ आहेत.

सोलापुरात काल ( ८ जून ) संपन्न झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलताना खा़ शरद बनसोडे यांनी वरील वादग्रस्त विधान केले़ आहे, ते म्हणाले ‘मुंबईचे आमचे काही मित्र बेळगाव मागतात़. आमच्या सांगलीजवळ जत तालुक्यात २५ हजार लोकवस्तीचे उमदी हे गाव आहे़ या गावात एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग आम्हाला कशाला हवाय बेळगाव’ असा सवालही त्यांनी केला़ आमच्या मित्राला विचारले कधी गेला होतास का उमदीला? तर तो म्हणाला, कधीच नाही़ हे असं आहे़ अशा शब्दात खा़ बनसोडे यांनी सीमाप्रश्नी आपली भूमिका मांडली़ यावेळी उपस्थित अनेकांच्या भूवया उंचावल्या़ त्याचबरोबर त्यांनी सीमाप्रश्नी आक्रमक राहिलेल्या मित्रपक्ष शिवसेनेलाही डिवचले़ आहे,

You might also like
Comments
Loading...