गुजरातची सत्ता भाजप गमावणार?;भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर 

sanjay kakde

पुणे- गुजरातमध्ये भाजपला मोठा फटका बसणार असून मित्र पक्षांची मदत घेतली तरी तिथे सत्ता मिळणार नाही असं भाकीत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवलं आहे.  काकडे यांच्या भाकीतामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी काकडे यांनी एक सर्वेक्षण केलं होतं, या सर्वेक्षणात भाजपला ९२ जागा मिळतील असा त्यांनी अंदाज वर्तवला होता आणि भाजपला पुण्यात ९८ जागा मिळाल्या होत्या. तशाच पद्धतीने काकडे यांनी गुजरातमध्ये देखील सर्वेक्षण केलं असून यामध्ये भाजपला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. या वृत्तपत्राशी बोलताना काकडे म्हणाले की “गेली अनेक वर्ष भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. पण यंदाची स्थिती ही भाजपसाठी चिंताजनक बनली आहे. दीर्घकाळ सत्तेत असल्याने यंदा आम्हाला(भाजपला) नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. गुजरातमधील मुसलमान हे भाजपवर नाराज असून नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांचं जसं गुजरातवर लक्ष होतं तसं त्यांना पंतप्रधान झाल्यापासून त्यांना इथे लक्ष देता येणं शक्य होत नाहीये. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा एकही उमेदवार भाजपला गेल्या ३ वर्षात सापडलेला नाहीये. विकासाचा मुद्दा हा भाजपच्या प्रचारातील मुख्य मुद्दा बनू शकला नाही. या सगळ्या गोष्टी पाहता मी गुजरातमध्ये पाठवलेल्या माणसांनी केलेल्या सर्वेक्षणात गुजरातमध्ये भाजपने गेल्या निवडणुकीत जो विजय मिळवला होता तशी कामगिरी करता येणं त्यांना शक्य होणार नाही असं दिसतंय”

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली