जवान लष्कारात आहेत म्हणजे ते मरणारच ; भाजप खासदाराने तोडले अकलेचे तारे

टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे नेते आणि मंत्री आपल्या वाचाळ वक्व्यामुळे कायम चर्चेत असतात पण आता तर भाजपच्या एका खासदाराने सैन्यातील जवानांबाबत अतिशय संतापजन वक्तव्य करून स्वतःच्या अकलेचे तारेच तोडलेत. भाजप खासदार नेपाल सिंग यांना शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला तेव्हा या महाशयांनी उत्तर दिल की, जवान लष्कारात आहेत म्हणजे ते मरणारच, मला जगात असा एखादा देश दाखवा जिथे जवान मरत नाहीत. गावातही दोन गटांमध्ये हाणामारी झाली तर एखादा जखमी होतोच.

नेपाल सिंह हे उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. आता देशभक्तीचे गोडवे गाणारे आणि 56 इंच छातीची भाषा करणारे पंतप्रधान या वाचाळ खासदारावर काय कारवाई करतात ते पहावं लागेल.

You might also like
Comments
Loading...