महाराष्ट्र भाजपला दणका: नाना पटोले करणार कॉंग्रेसमध्ये घरवापसी ?

टीम महाराष्ट्र देशा: भंडारा- गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांना उधान आले आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवल्याने नाना पटोले हे भाजपमधून बाहेर पडणार याची चर्चा सुरु होती. अखेर आज लोकसभा महासचिव यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. दरम्यान राजीनाम्यानंतर अहमदाबाद येथे 11 डिसेंबरला ते काँग्रेसच्या व्यासपीठावर असणार आहेत, मात्र त्यादिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे पहाव लागणार आहे.

गेल्या नाके दिवसांपासून मनामध्ये घुसमट होती. ती आता दूर झाली असून भाजपमध्ये जय उद्देशाने गेलो होतो तो पूर्ण होत नसल्याने राजीनामा दिल्याच नाना पटोले यांनी सांगितल आहे.