बलात्काराच्या घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जाते ; हेमा मालिनी यांनी उधळले मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहेच मात्र सध्या अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे. कदाचित आधीही अशाप्रकारच्या घटना घडत असतील मात्र त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत’, असे धक्कादायक विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे.

मथुरा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या हेमा मालिनी यांना बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत विचारले असता त्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. ज्या घटना घडत आहेत. त्या रोखल्या पाहिजेत. अशा घटनांनी देशाचे नाव बदनाम होत आहे, असे त्या म्हणाल्या. बलात्काराच्या घटनांना प्रमाणापेक्षा अधिक प्रसिद्धी दिली जात असल्यावर त्यांनी आक्षेप घेतला.