fbpx

लोकसभेच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब, ओम बिर्ला होणार नवे अध्यक्ष

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे, सर्व खासदारांचा शपथविधी पार पडला आहे, दरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न कायम होता, आता राजस्थानमधून भाजप खासदार असणारे ओम बिर्ला यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

ओम बिर्ला हे राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत, बिर्ला यांनी ६ वर्षे भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळले आहे. बिर्ला यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमिता बिर्ला अध्यक्षपदासाठी संधी दिल्याबद्दल सर्व मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया, राधामोहन सिंह आणि डॉ. विरेंद्र कुमार या दिग्गज नेत्यांची नावे आघाडीवर होती, मात्र आपल्या शैलीनुसार ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाना धक्का दिला आहे.