भाजपला दिल्लीमध्ये धक्का, खासदाराने केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश

dr udit raj

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे, यामध्ये भाजप क्रमांक एकवर आहे. मात्र दिल्लीमध्ये भाजपला धक्का बसला असून विद्यमान खासदार डॉ उदित राज यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये राज यांनी कॉंग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे.

डॉ उदित राज हे माजी सनदी अधिकारी आहेत, सरकारी सेवेचा राजीनामा देत भारतीय न्याय पक्षाची स्थापना केली होती, २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, पुढे २०१४ मध्ये आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करत त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

कॉंग्रेस प्रवेशावेळी उदित राज यांनी भाजप नेतृत्वावर निशाणा साधला आहे, भाजपने उदित यांना दिल्लीतून तिकीट लवकर जाहीर न केल्याने वैतागून त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये स्वतःचा पक्ष विलीन करत एक दलित नेता म्हणून काम केलं, याचं भाजपने मला हे फळ दिले का ? असा सवाल यावेळी उदित राज यांनी उपस्थित केला आहे.