GDP म्हणजे रामायण, महाभारत नाही, लोकसभेत भाजप खासदार बरळला

टीम महाराष्ट्र देशा : देशाची अर्थव्यवस्था प्रचंड मंदीच्या छायेत असतानाही भाजप नेते लोकसभेत त्या विषयी गांभीर्याने भाष्य करताना दिसत नाहीत. उलट GDP घसरला म्हणजे फार काही नुकसान झालं नाही, असे वक्तव्य ते करत आहेत. त्यामुळे विरोधक आणि उद्योगपतींकडून अशा भाजप नेत्यांवर संताप व्यक्त केला जात आहे.

आजही लोकसभेच्या अधिवेशनात आर्थिक विषयांवर चर्चा झाली. यावेळी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी GDPवरून मुक्ताफळं उधळली. GDP ही संकल्पना 1934 मध्ये आली. याआधी GDP नव्हताच. त्यामुळे GDP म्हणजेच आर्थिक विकास दर हे काही बायबल, रामायण, महाभारत नाही. भविष्यातही GDP चा फारसा उपयोग होणार नाही. तसेच सामान्य माणसाचं सतत आर्थिक कल्याण होतं की नाही हे महत्त्वाचं आहे. GDP पेक्षाही विकास महत्त्वाचा आहे, त्यामुळे GDP घसरला म्हणून फार काही होत नाही, असे वक्तव्य दुबे यांनी सभागृहात केले आहे.

दरम्यान कॉंग्रेस नेते आधी रंजन चौधरींची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कार्पोरेट टॅक्सबाबत सरकारची भूमिका मांडली. त्यावर बोलताना आधी रंजन चौधरी यांनी सीतारामन यांचा ‘निर्बला’ असा उल्लेख केला. यावर भाजप खासदरांनी आक्षेप घेत सभागृहात चांगलाचं गदारोळ घातला.

महत्वाच्या बातम्या

Loading...