कोरबा आणि छत्तीसगडच्या मुली टनाटन :भाजप खासदार बन्सीलाल महतो

mahato

वेब टीम :भाजपच्या वाचाळ नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच असून आता भाजपचे ७७ वर्षीय खासदार बन्सीलाल महतो यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई आणि कोलकाताच्या मुलींची आवश्यकता उरली नाही. छत्तीसगडच्या मुली दिवसे न् दिवस टनाटन होत आहेत, असं वादग्रस्त विधान महतो यांनी केल आहे .

गांधी जयंती निमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचं उदघाटन करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. महतो यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असून महतो यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
काय म्हणाले महतो ?
आज खूपच आनंदाचा दिवस आहे. राज्याचे क्रीडा मंत्री भैय्यालाल रजवाडे मला नेहमीच सांगतात आता मुंबई आणि कोलकात्याच्या मुलींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडच्या मुली आता टनाटन होत आहेत
दरम्यान माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे चिरंजीव अमित जोगी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमित यांनी महतो यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. एका बुजूर्ग खासदाराला असं वक्तव्य करणं शोभत नसल्याचं सांगतानाच यातून भाजपची मानसिकताच दिसून येत असल्याची टीका अमित जोगी यांनी केली.