मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होणार भाजप-मनसे युती? भाजपच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

bjp-mns

मुंबई – आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला काही प्रमुख भाजप नगरसेवकांना बोलावण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते.

या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की अन्य कुणाला सोबत घ्यायचं यावरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मनसेबरोबर युती करता येऊ शकते का? मनसेचा प्रांतवाद बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एकत्रित येता येईल का? या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP